Logo
A Govt of Maharashtra Undertaking

Punyashloka Ahilyadevi Maharashtra Mendhi Va Sheli Vikas Mahamandal

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
swachhbharat

In Progress Schemes

महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना


राज्यातील मेंढी पालन व्यवसायास गती देण्याकरिता महामंडळामार्फत राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सन २०१७-१८ वर्षापासून राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गाकरिता राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत २० मेंढया व १ मेंढानर अशा प्रकारचे मेंढ्यांचे गट स्थायी व स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालन करणे करिता ७५% अनुदानावर पुरवठा करण्यात येत आहे. याच बरोबर पैदासिकरीता मेंढेनर, पायाभूत सोई सुविधेकरिता व खाद्याकरिता ७५% अनुदान तसेच मुरघास बनविण्याचे यंत्र व खाद्य कारखाने करिता ५०% अनुदान देण्यात येत आहे. सदर योजना राबविणेकरिता सन २०१७-१८ ते २०१८-१९ मध्ये रु. ११६४.८० लक्ष तसेच सन २०१९-२० मध्ये ३९००.०० लक्ष निधी प्राप्त झालेला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत केंद्रिय लोकर विकास मंडळ, वस्त्रोद्योग मंत्रालय जोधपूर यांचे अर्थ सहाय्याने मेष व लोकर सुधार प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातील अहमदनगर, नाशिक,धुळे, पुणे, सांगली व सोलापूर या जिल्हयातील ३३११ मेंढपाळांच्या ३,००,००० मेंढया नोंदणी करण्यात आलेल्या आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मेंढ्यांना आरोग्य सुविधा पुरविणे, स्थानिक मेंढयांमध्ये अंनुवंशिक सुधारणा घडवून आणणे या करिता मेंढेनर पुरवठा करणे इ. बाबींचा समावेश आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार यांचे अर्थसहाय्याने मेंढपाळ विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये १८ ते ५० वयोगटातील मेंढपाळांना रु. ८०/- मध्ये १ वर्षाकरिता (१ जून ते ३१ मे या कालावधी करिता) रु. २.०० लाखाचे विमा सुरक्षा देण्यात येत आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या पडेगाव (औरंगाबाद), बिलाखेड (जळगाव), महूद ( सोलापूर), दहिवडी (सातारा), अंबेजोगाई (बीड) या ५ प्रक्षेत्राचे बळकटीकरण करणे या योजनेस शासन निर्णय क्र. पविआ-२०१६/प्र.क्र.५७४/पदुम-३ दि. १२ मे २०१७ अन्वये रु. ३.७४ कोटी येवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेखाली ५ प्रक्षेत्रावर पायाभुत पशुधन खरेदी (२०० उस्मानाबादी शेळया + ८ उस्मानाबादी बोकड), वाडे बांधकाम, सिंचन सुविधा, मुरघास खड्डा व कुंपण इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.


राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या १० प्रक्षेत्रांवर नरमेंढे व बोकड संगोपन केंद्र स्थापन करणे या योजनेस शासन निर्णय क्र. पविआ-२०१६/प्र.क्र.१७/पदुम-३ दि. १२ मे २०१७ अन्वये रु. १.०१ कोटी येवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेखाली प्रत्येक प्रक्षेत्रावर ३ ते ४ महिने वयाचे ५० बोकड/मेंढेनर खरेदी करून त्यांचे १ वर्ष प्रक्षेत्रावर संगोपन करुन पैदाशीकरिता शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहेत.