राज्यामध्ये शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा प्रामुख्याने ग्रामिण भागामध्ये केला जातो. शेळयामेंढयांच्या मांसाचे वाढते भाव, त्यामुळे खात्रीची बाजारपेठ, एकापेक्षां अधिक करडे देण्याची क्षमता, इतर रवंथ करण्या-या जनावरांपेक्षा तुलनात्मक दृष्टया लवकर वयांत आणि वजनांस येण्याची क्षमता इ. बाबींमुळे, सुशिक्षीत बेरोजगार युवक, शेतकरी ह्या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. शासन, बँका, विविध समाज विकास महामंडळ व शासकीय विभाग यांच्या विविध योजनाअंतर्गत कर्ज आणि अर्थ सहाय्य देत असतात. शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करतांना नवनवीन तंत्रज्ञान तसेच या व्यवसाया संबंधी तांत्रिक माहिती उपलब्ध होऊन सदरचा व्यवसाय फायदेशीर व्हावा, ह्या करिता विविध वित्तिय संस्था ह्या व्यवसायला कर्ज देतांना “शेळी-मेंढीपालन प्रशिक्षण” प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालतात. ह्या सर्व बाबींचा विचार करुन तसेच कौशल्य विकासाच्या दृष्टीने शेळी मेंढी पालनाचे नवीन तंत्रज्ञान शेतकर्यावपर्यंत पोहचून या व्यवसायाकरिता उद्युक्त करणेकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवर व मुख्य कार्यालय, गोखलेनगर येथे शेळी- मेंढीपालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात येते तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यांत येते. सदर प्रशिक्षणामध्ये खालील माहिती देण्यात येते.
महाराष्ट्रातील शेळी व मेंढी पालन व्यवसाय | महाराष्ट्रातील शेळया व मेंढयांची संख्या, मांसाचे उत्पादन, महाराष्ट्र राज्यातील वधगृहे, मांसाची निर्यात, लोकर उत्पादन, दुध उत्पादन, मेंढपाळांच्या समस्या. |
शेळया व मेंढयांच्या जाती | शेळया मेंढयांच्या विभागनिहाय जाती, गुणवैशिष्टये, महाराष्ट्रातील उस्मानाबादी व संगमने री शेळया तसेच दख्खनी व माडग्याळ मेंढयांची गुणवैशिष्टये. |
शेळीपालनाच्या पध्दती | मुक्त व्यवस्थापन, मिश्र व्यवस्थापन, ठाणबंद पध्दतीने शेळी पालन या विषयी विस्तृत माहिती |
शेळयांसाठी निवारा | शेळयांच्या वाडे बांधकामासाठी जागेची निवड करणे, गोठयांचे प्रकार, वाडेबांधकामासाठी दिशा व वायु विजन |
शेळयांचा आहार | शेळयांच्या आहारात अन्न द्रव्याची गरज (प्रथिने , कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, पाणी, क्षार व जीवनसत्वे) शेळयांच्या आहारातील चारा व पशुखाद्य, करडांचा आहार, प्रजननासाठी वापरण्यात येणा-या बोकडांचा आहार, गाभण शेळीचा आहार, मुरघास तयार करण्यांच्या पध्दती व फायदे |
प्रजनन | शेळया मेंढयामधील प्रजनन पध्दती (बाह्य प्रजनन, अंर्तगत प्रजनन, उत्तरोत्तर प्रगती पध्दती, संकरीत प्रजनन), प्रजननाची मुक्त पध्दत, मर्यादित मुक्त पध्दत, नियंत्रित प्रजनन पध्दत, प्रजनन हंगामातील पुर्व तयारी, पैदासीसाठी शेळयांची व बोकडाची निवड, ऋतुकालावधी, कृत्रीम रेतनाद्वारे शेळी सुधारणा, एकाच वेळी शेळया माजावर आणावयाच्या पध्दती, प्रजनन हंगाम |
करडे व कोकरांचे संगोपन | नवजात करडांचे संगोपन, चिकाचे महत्व, अनाथ करडांचे संगोपन, करडांचे दुध तोडणे, करडांमधील मरतुक, वाढत्या करडांचा आहार. |
शेळया मेंढयांचे आजार | अजारी शेळयांची लक्षणे, विषाणुमुळे होणारे रोग, जिवांणुमुळे होणारे रोग, बाह्य किटक तसेच परजिवी पासून होणारे आजार. |
प्रतिबंधक उपाय | जंतनाशके, किटकनाशके यांचा वापर, लसीकरण, प्रथमोपचार. |
शेळया-मेंढयाचा विमा | विम्याची वयोमर्यादा, विमा हमी रक्कम, विमा दर नुकसान भरपाई, विमादावा पध्दती |
शेळया-मेंढयांची वाहतुक व विक्री | शेळयां- मेंढयांची विक्री किंमत ठरविणे, वाहतुकीमध्ये घ्यावयाची काळजी. |
शेळी पालन प्रकल्प अहवाल | प्रकल्प अहवालासोबत करावयाच्या कागद प्रत्राची पुर्तता, करडांचे उत्पादन, मृत्युचे प्रमाण, लेंडी खताचे उत्पादन, दुध उत्पादन, विमा, शेळयांचे औषधउपचार, अनावर्ती खर्च, आवर्ती खर्च, वार्षिक नफा. |
प्रक्षेत्रांवर ठेवावयाच्या नोंदी | वंशावळ नोंदी, वजन वाढी संबंधी नोंदी, प्रजनन व जनन नोंदी ई. |
शेळ्या मेंढया करिता उपयुक्त चारा पिके | या व्यवसायामध्ये अधिक उत्पादन मिळणेसाठी शेळ्या मेंढ्यांना हिरव्या चार्यांसचा सतत पुरवठा होणे आवश्यक आहे. बहुवार्षिक चारा पिकांची माहिती. त्याकरिता मशागत, लागवडीची पद्धत, खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, आंतरमशागत, चारा उत्पादन ई. |
प्रवेश प्रक्रिया : सर्वांकरिता प्रशिक्षण उपलब्ध आहे.
निवास व भोजन : प्रशिक्षणार्थीने स्वत: सोय करवायची आहे.
अकं | स्थळ (पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र) | दूरध्वनी क्रमांक | वेळापत्रक | शुल्क | कालावधी |
---|---|---|---|---|---|
१ | प्रक्षेत्र, बिलाखेड, जिल्हा: जळगांव | 02589/222457 मो. : 9527589928 | प्रत्येक महिन्याच्या २३, २४, २५ तारखेस | रु. ५००/- | ३ दिवस |
२ | प्रक्षेत्र, पडेगांव, जिल्हा:.औरंगाबाद | 0240/2370449 मो. :८८३०३२०३९९ | प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात | रु. ५००/- | ३ दिवस |
३ | प्रक्षेत्र, अंबेजोबाई, जिल्हा:.बीड | 02446/247239 मो. :9763749783 | प्रत्येक महिन्याच्या २५, २६, २७ तारखेस | रु. ५००/- | ३ दिवस |
४ | प्रक्षेत्र, मुखेड, जिल्हा:.नांदेड | 02461/202022 मो. : 945494770 | प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात | रु. ५००/- | ३ दिवस |
५ | प्रक्षेत्र, महुद, जिल्हा:.सोलापूर | 02187/202300 मो. 9545467589 | प्रत्येक महिन्याच्या दूसरा व चौथा सोमवार ते बुधवार | रु. ५००/- | ३ दिवस |
६ | प्रक्षेत्र, तुळजापूर, जिल्हा: .उस्मानाबाद | 02471/259066 मो. :945494770 | प्रत्येक महिन्याच्या २५, २६, २७ तारखेस | रु. ५००/- | ३ दिवस |
७ | प्रक्षेत्र, दहिवडी, जिल्हा: .सातारा | 02165/204480 मो. :9404296508 | प्रत्येक महिन्यात दूसरा सोमवार ते बुधवार | रु. ५००/- | ३ दिवस |
८ | प्रक्षेत्र, रांजणी, जिल्हा: .सांगली | 02341/244222 मो. : 9764634319 | प्रत्येक महिन्यात दूसरा सोमवार ते बुधवार | रु. ५००/- | ३ दिवस |
९ | प्रक्षेत्र, पोहरा, जिल्हा: .अमरावती | 0721/2020523 मो. : 9890031756 | प्रत्येक महिन्यात २५, २६, २७ तारखेस | रु. ५००/- | ३ दिवस |
१० | प्रक्षेत्र, बोंद्री, जिल्हा: नागपूर | 9890031756 | प्रत्येक महिन्यात दूसरा शनिवार रविवार व सोमवार | रु. ५००/- | ३ दिवस |
११ | मेंढी फार्म, गोखले नगर, पुणे | 020/25657112 8888890270 | दर महिन्याला | रु. २०००/- | ३ दिवस |
(टीप: वरील प्रक्षेत्रावर प्रशिक्षण घेणे साठी प्रवेशाकरिता प्रथम संपर्क करून वेळ व तारीख निश्चित करावी)